आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

pune - कर्ज फेडण्यासाठी मित्रालाच मागितली 10 कोटींची खंडणी, बिंग फुटताच हाती पडल्या बेड्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी-चिंचवड- कर्जाचा बोझा कमी होत नसल्याचे पाहून मित्रालाचा दहा कोटी रुपयांची खंडणी मागणा-या युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी युवकाने नोकरीसाठी मिळण्याच्या आमिषातून तीन लाख रुपये भरले होते पण त्याची फसवणूक झाली. परिणामी तो कर्जबाजारी झाला आणि कर्ज फेडण्याची एेपत नसल्याने त्याने आपल्या मित्रालाचा लक्ष्य   केले. 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परमेश्वर देशमुख (वय 28) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत सुनील पाटील (रा. लोढा बेलमोन्ध) यांनी याप्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुनील आणि परमेश्वर दोघे चाकण येथील एकाच कंपनीत काम करत होते. काही कालावधीनंतर परमेश्वर याला एका अज्ञात व्यक्तीने नोकरीचे आमिष दाखवून तीन लाख रुपये घेतले. ही रक्कम त्याने कर्ज काढून घेतली होती. पैसे घेऊन नोकरी मिळाली नसल्याने परमेश्वरवर कर्जाचा बोझा वाढला. हे कर्ज फेडण्यासाठी त्याने खंडणी मागण्याचा मार्ग अवलंबिला. 
 
परमेश्वर याने 18 मे रोजी सकाळी सुनीलला फोन केला. सुनील यांनी फोन न उचलल्याने त्याने सुनील यांना खंडणीचा मेसेज केला. त्यामध्ये त्याने '10 कोटी रुपये दो नहीं तो ठोक देंगे' अशी धमकी दिली. अनोळखी क्रमांकावरून मेसेज आल्याने सुनील यांनी तळेगाव पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी प्रकरणाची कसून चौकशी करत परमेश्वर याला दोन दिवसात शोधून काढले. दरम्यान, परमेश्वर याने चलाखी दाखवत त्याचे सिमकार्ड हरवल्याची तक्रार दिली होती. त्याच नंबरवरून सुनील यांना खंडणीचा मेसेज आला होता. यामुळे पोलिसांनी तपास करताच परमेश्वर याचे बिंग फुटले. पोलिसानी त्याला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 

बातम्या आणखी आहेत...