आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात मद्यधुंद तरुणाकडून नग्न अवस्थेत स्कूल व्हॅनसह अन्य चारचाकी वाहनांची तोडफोड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- विमाननगर येथे मद्यधूंद नग्न अवस्थेत तरुणाने चारचाकी गाड्यांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. म्हाडा कॉलनीत पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला. या तरुणाने एका स्कुलव्हॅनसह दोन चारचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. 
 


चाकू  उर्फ  प्रशांत गलांडे (वय 23, रा. म्हाडा कॉलनी, विमाननगर) असे या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी दर्शन पांडुरंग चव्हाण (रा. म्हाडा कॉलनी, विमाननगर, पुणे) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कलम 504 व कलम 427 नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास गलांडे मद्यधूंद आणि नग्न अवस्थेत म्हाडा कॉलनीत आला. यावेळी तेथील रहिवाशांनी रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्यांवर त्याने दगड मारण्यास सुरुवात केली. यामध्ये एका स्कूलव्हॅन आणि अन्य एका चारचाकी वाहनाचे नुकसान झाले. या गोंधळादरम्यान जागे झालेल्या रहिवाशांनी प्रशांत गलांडे याला पकडून चोप दिला. त्याला एअरपोर्ट पोलिस चौकीत नेले आणि त्याच्याविरोधात तक्रार दिली. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो

बातम्या आणखी आहेत...