आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवकाने केली आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले- नर्मदेच्या पाण्याने अंघोळ घाला, मंडेलश्वरमध्ये करा अंत्यविधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी- चिंचवड- एका युवकाने गळफास घेत इमारतीच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. युवकाच्या खुशात चिट्ठी सापडली असून, नर्मदेच्या पाण्याने अंघोळ घालून मंडलेश्वर येथे अंत्यसंस्कार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ही घटना चिंचवड येथे सोमवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. जतीन धनंजय जहागीरदार (वय 34, रा. चिंचवडगाव), असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी जतीनने चिंचवडगाव येथील राहत्या घराच्या गच्चीवरील कठड्याला दोरी बांधून इमारतीवरून उडी मारली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. इमारतीबाहेर मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसल्याने परिसरातील नागरिकांनी अग्निशामक दलास याबाबत माहिती दिली. जतीन हा आपल्या मित्रांसोबत घराच्या छतावर झोपायला गेला होता. सकाळी मित्रांना तो दिसला नाही तेव्हा त्यांनी जतीनचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर जतीनचा मृतदेह बिल्डिंगला लटकलेल्या अवस्थेत आढळला. याची माहिती तात्काळ चिंचवड पोलिसाना घटनेची माहिती देण्यात आली. 

 

जतीनच्या खिशात सुसाईड नोट सापडली आहे. यामध्ये जतीन ने आपल्या आत्महत्येस कोणाला जबाबदार धरू नये. घरच्यांनी एकमेकांशी जुळवून घ्यावे. तसेच माझा माझ्या दुचाकीमध्ये जीव आहे. त्यामुळे ती विकू नये. अशी शेवटची इच्छा असल्याचे लिहून ठेवले आहे. तसेच माझ्या मृत्यूनंतर माझी नर्मदेच्या पाण्याने अंघोळ घालावी, आणि मंडलेश्वर ठिकाणी माझ्यावर अंतिम संस्कार करण्यात यावे असे म्हटले आहे.जतीन आपल्या आई वडील, भाऊ वहिनी सह चिंचवड मध्ये राहत होता. जतीनचे लग्न देखील झाले नव्हते.

बातम्या आणखी आहेत...