आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परदेशी नागरिकाच्या कारने मोटारसायकलला दिली धडक, एकाचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- परदेशी नागरिकाच्या भरधाव कारने एका मोटारसायकलला धडक दिल्याने मोटारसायकलवरील एका युवकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीररित्या जखमी झाला आहे. येमेन येथील नागरिकाने नशेत कार चालवल्यामुळे हा अपघात झाल्याचे कळते. कोंढवा पोलिसांनी त्याला अटक केली आहे. हा अपघात येवलेवाडीत सोमवारी रात्री आठ वाजता झाला. 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात  परशुराम दळवी हा इसम मृत पावला आहे तर त्याचा साथीदार विनोद शेंडकर गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. पोलिसांनी आजाज अहमद अल अमरी या येमेनी नागरिकाला अटक केली आहे.  परशुराम व विनोद हे दोघे मोटारसायकलवरुन जात होते त्यावेळी पाठीमागून आलेल्या परदेशी नागरिकाच्या कारने त्यांच्या कारला धडक दिली. त्यानंतर तो कार न थांबवता निघून गेला. यावेळी त्याठिकाणी भालेराव नावाची व्यक्ती पोहचली त्याने. दोघांना हाॅस्पिटलमध्ये नेले. डाॅक्टरांनी परशुरामला मृत घोषित केले. 

बातम्या आणखी आहेत...