आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे- हायवे वर उभ्या ट्रकला धडक दिल्याने कारचा चक्काचूर, दोन जणांचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी चिंचवड- मुंबई- बंगळुरु महामार्गावर भरधाव कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने कारमधील दोन तरुणांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री 1 वाजण्याचा सुमारास पुनावळे परिसरात घडली. अभिषेक मनोज माने (वय 19) आणि अल्ताफ शेख (वय 28, दोघेही रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.

 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्ताफ आणि अभिषेक दोघे होंडा सिव्हीक कार मध्ये मुंबई- बंगळुरु महामार्गावर जात होते. पुनावळे परिसरात रस्त्याच्या कडेला ट्रक उभा होता. मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास भरधाव वेगात असणाऱ्या कार चालकाला ट्रक न दिसल्याने ट्रक ला मागून धडक दिली. भरधाव वेगात असल्या कारणाने अपघातात कारचा चक्काचूर झाला असून अपघातात दोघे तरुण  गंभीर जखमी झाले होते. तात्काळ स्थानिक नागरिकांनी दोघांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. हिंजवडी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस पुढील तपास करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...