आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरी चिंचवड: घरगुती वादातून तरूणाची आत्‍महत्‍या, विषारी औषध केले सेवन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी चिंचवड- विषारी औषध पिऊन तरुणाने आत्‍महत्‍या केल्‍याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. आत्महत्येपूर्वी तरुणाने चिठ्ठी लिहिली असून यात आर्थिक वादातून भावांकडून सतत मारहाण होत असल्याने आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. वाकड परिसरात ही घटना घडली आहे.


अविनाश संभाजी पवार (31) असे तरुणाचे नाव असून ते बेलठिका नगर, थेरगाव, पुणे येथील रहिवासी आहे. अविनाश यांनी रविवारी रात्री उशिरा विषारी औषध घेऊन आत्महत्या केली होती. त्यांचा मृतदेह सोमवारी सकाळी थेरगाव येथे आढळला. याप्रकरणी वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

सोमवारी सकाळी वाकडमधील थेरगाव येथे रॉयल्स बेकरी समोर तरुण बेशुद्ध अवस्थेत पडून असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरूणाला ताबडतोब रुग्‍णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पोलीस तपासात तरुणाच्या जवळ चिट्ठी सापडली आहे. त्‍यामध्ये लिहीले आहे की, 'आर्थिक वादातून भावांकडून होणाऱ्या मारहाणीला कंटाळून मी आत्महत्या करीत आहे.' पोलिसांनी अविनाश पवारचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून पुढील तपास करीत आहे.

 

बातम्या आणखी आहेत...