आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांना शाळेत प्रवेश मिळण्यासाठी तरुणाने लढवली अफलातून शक्कल, खावी लागली जेलची हवा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- आपल्या ओळखीच्या मुलांना पुण्यातील प्रसिद्ध शाळेमध्ये प्रवेश मिळावा यासाठी पंतप्रधान कार्यालय आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा असलेल्या कार्यालयाचे राजमुद्रा असेलेले नकली लेटरपॅड तयार करण्या-या तरुणास पोलिसांनी अटक केली आहे. प्रणव भिकू इदाते असे या तरुणाचे नाव आहे. प्रणवने कल्याणीनगरमधील बिशप शाळेत हे लेटर सादर केले होते. या लेटरमुळे त्याच्या मुलांना सहज प्रवेश मिळेल असा त्याचा समझ होता. 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणव इदाते याच्या ओळखीच्या काही व्यक्तीच्या मुलांना पूर्व प्राथमिक आणि तिसरीमध्ये बिशप शाळेत प्रवेश घ्यायचा होता. प्रवेश मिळणे कठीण असल्याने प्रणवने इंटरनेटवरून पीएमओ कार्यालय आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्रपदाचा दर्जा असलेल्या कार्यालयाचे राजमुद्रा असलेले लेटर पॅड तयार केले. त्यावरून शिफारस पत्र देखील तयार केले. या पत्रामुळे तातडीने मुलांना प्रवेश मिळेल असे त्याला वाटले. त्याच दरम्यान बिशप शाळेच्या प्राचार्य शेन मेकफरसन यांना याचा संशय आल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार पंतप्रधान कार्यालयातील सामाजिक तपास पथकाने पुण्यात येऊन चौकशी केली. त्या चौकशीतून ते पत्र बनावट असल्याचे उघड झाले. या प्रकरणी प्रणव भिकू इदाते याला अटक केलीय. 

बातम्या आणखी आहेत...