आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात निगडीतील अजंठानगर येथे पूर्ववैमनस्यातून दगडाने ठेचून युवकाचा खून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- निगडी परिसरात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना सायंकाळी पाचच्या सुमारास घडली आहे.  या घटनेनंतर आरोपी हा फरार झाला असून अमित पंडित कांबळे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी परिसरातील पत्राशेड अजंठा नगर येथे पूर्ववैमनस्यातून अमित पंडित कांबळे (वय 22, रा. कृष्णा नगर, समाधान हौसिंग सोसायटी, निगडी) याचा खून झाला आहे.तो कृष्णानगर येथे राहत होता. परंतु त्याचे नातेवाईक हे अजंठानगर पत्राशेड येथे राहत असल्याने तो नेहमी या परिसरात असायचा, अशी माहिती निगडी पोलिसांनी दिली आहे. तो काही काम करत नव्हता .त्याचे काही दिवसांपूर्वी एक तरुणाशी भांडण झाले होते. याचाच राग मनात धरून आज सकाळी पाचच्या सुमारास अज्ञात तरुणाने दगडाने ठेचून अमितची हत्या केली आहे .हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला आहे. त्याचा शोध निगडी पोलिस घेत आहेत. या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी हे करत आहेत.