आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरी चिंचवडमध्‍ये इस्‍टेट व्‍यवसायिकाची डोक्‍यात धारदार शस्‍त्राने वार करुन हत्‍या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पिंपरी चिंचवडमधील दिघी येथे गणेश अंताराम गंगणे (वय 40) या इस्‍टेट व्‍यवसायिकाची धारदार शस्‍त्राने डोक्‍यात वार करुन निर्घुणपणे हत्‍या करण्‍यात आली आहे. काल शनिवारी मध्‍यरात्रीच्‍या सुमारास ही घडली.

 

याप्रकरणी मृत गणेश यांचा भाऊ सुरेश अंताराम गंगणे (45) यांनी दिघी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्‍यानूसार गणेश हे त्‍याच्‍या मित्रांसह दिघी येथील हॉटेल न्‍यू मोहर येथे जेवण्‍यासाठी गेले होते. मात्र थोड्याच वेळाने सुरेश यांना फोन आला की, त्‍यांच्‍या भावाचे भांडण झाले असून तातडीने दिघी येथे या. घटनास्‍थळी गेल्‍यावर सुरेश यांना त्‍यांचा भाऊ पूर्ण रक्‍ताच्‍या थारोळ्यात आढळला. त्‍यांच्‍या डोक्‍याला गंभीर जखमा झाल्‍या होत्‍या व मेंदू बाहेर येऊन मोठ्या प्रमाणात रक्‍तस्‍त्राव झाला होता. थोड्याच वेळात पोलिसही घटनास्‍थळी दाखल झाले. नंतर गणेश यांना अॅम्‍बुलन्‍सद्वारे पिंपरी पुणे येथील वाय.सी.एम हॉस्‍पीटलमध्‍ये नेण्‍यात आले.

 

मित्रांवर संशय
तक्रारीमध्‍ये सुरेशने यांनी म्‍हटले आहे की, तेथे जमलेल्‍या लोकांनी दिलेल्‍या माहितीनूसार गणेश यांच्‍या मित्रांनीच त्‍यांचा खून केला. यावरुन सुरेश यांनी मित्रांविरोधात खुनाची तक्रार दिली आहे. खुनाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र पूर्ववैमनस्‍यातून गणेश यांची हत्‍या झाली असावी असा संशय सुरेश यांनी व्‍यक्‍त केला आहे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, घटनास्‍थळावरील फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...