आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेयसीशी लग्न करण्यासाठी आरोपीने केले तिच्या भाच्याचे अपहरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - प्रेयसीशी लग्न करता यावे म्हणून प्रियकराने  तिच्या १४ वर्षीय भाच्याचे अपहरण केल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली असून अपहृत मुलाची सुटका केली. कृष्णा राजू राठोड (२३, रा. व्यंकटपूर तांडा, मेहबूबनगर, तेलंगणा) असे आरोपीचे नाव आहे. त्याने शिव संतोष नाईक या मुलाचे अपहरण केले होते. कृष्णा हा रिक्षाचालक आहे. त्याचे शिवच्या आत्यासोबत प्रेमसंबंध आहेत. याबाबत शिवच्या आई-वडिलांना समजल्यावर त्यांनी कृष्णाला मारहाण केली. कृष्णाला मात्र तिच्याशीच विवाह करायचा होता. त्याने तिचा भाचा शिव याचे अपहरण करण्याचे ठरवले.  शिव सकाळी नऊ वाजता शाळेत गेला. त्यानंतर त्याने शिवचे अपहरण केले. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर काही तासांतच पोलिसांनी आरोपीला अटक केली. दरम्यान, याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...