आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सप्तशृंग गडासाठी २५ कोटींच्या आराखड्यास लवकरच मंजुरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वणी/ खेडगाव/पिंपळगाव वाखारी- उत्तर महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री सप्तशंृग गडाच्या विकासासाठी २५ कोटी रुपयांचा विकास आराखड्यास लवकरच मंजुरी देण्यात येईल. जिल्ह्याच्या धार्मिक पर्यटन हबला चालना देण्यासाठी सर्वतोपरी मदत करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सप्तशंृगगड येथे फ्युनिक्युलर ट्राॅलीच्या उद‌्घाटन सोहळ्यात ते बाेलत हाेते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री गिरीश महाजन हे होते. 


फ्युनिकुलर ट्राॅलीच्या उद‌्घाटन साेहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी बांधकाममंत्री छगन भुजबळ, राज्यमंत्री दादा भुसे, खा. हरिश्चंद्र चव्हाण, आ. जे. पी. गावित, डॉ. राहुल आहेर, नरेंद्र दराडे, जि.प. अध्यक्षा शीतल सांगळे, आ. नरहरी झिरवळ, आ. दीपिका चव्हाण, आ. सीमा हिरे, आ. बाळासाहेब सानप, आ. देवयानी फरांदे, आ. पंकज भुजबळ, समीर भुजबळ, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, सुनील बागूल, उपसरपंच राजेश गवळी, दादाराव जाधव, माजी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, सुधाकर पगार, नंदकुमार खैरनार, संदीप बेनके व्यासपीठावर उपस्थित होते. फडणवीस म्हणाले की, देशातील पहिला फ्युनिकुलर रोप वे इमारत सर्व सोयीसुविधांयुक्त दर्जेदार बनले आहे. गुरुबक्षाणी व सार्वजनिक बांधकाम विभागाने चांगली याेजना उभारून धार्मिकबरोबरच पर्यटन विकासाला चालना देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. नाशिक गुणसंपन्नतेबराेबरच धार्मिक क्षेत्रातही अग्रेसर आहे. आजचा दिवस भाविकांसाठी ऐतिहासिक दिवस असून, दिव्यांगांसह ज्येष्ठ नागरिकांसाठी ट्रॉली उपयुक्त ठरणार असल्याचे गौरवाेद‌्गार फडणवीस यांनी काढले. माजी बांधकाममंत्री भुजबळ म्हणाले की, मी स्वित्झर्लंडमध्ये फ्युनिक्युलर रोप वे बघितला. सप्तशंृग गडावर असे करता येईल, या उद्देशाने नऊ वर्षांपूर्वी त्याची मुहूर्तमेढ रोवली. आज या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा पार पडत असल्याने आनंद झाला आहे. पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले की, फ्युनिक्युलरच्या उद‌्घाटनास उशीर झाला तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध खात्याच्या परवानगी मिळाल्यानंतरच हे लाेकार्पण होत आहे. यावेळी राजकुमार गुरुबक्षणी, प्रधान न्यायाधीश सूर्यकांत शिंदे, अध्यक्षा श्रीमती यू. एन. नंदेश्वर, डॉ. रावसाहेब शिंदे, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी सत्कार केला. सरपंच सुमनबाई सूर्यवंशी, उपसरपंच राजेश गवळी, गिरीश गवळी, ललिता व्हरगळ, ग्रामसेवक आर. बी. जाधव यांनी सत्कार केला. यावेळी बांधकाम सचिव मनोज सौनिक, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पाेलिस अधीक्षक डॉ. संजय दराडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, मुख्य अभियंता हेमंत पगारे, अपर जिल्हाधिकारी अमन मित्तल, भाऊलाल तांबडे, गजानन शेलार, नितीन पवार, भारती पवार, अॅड. रवींद्र पगार, सुनील सूर्यवंशी, अानंद साेनवणे उपस्थित हाेते. 


मांजरपाड्याचे उर्वरित काम लवकरच 
नाशिकमधील बोट प्रकल्प व मांजरपाड्याचे काम पूर्ण करून त्याचे पुण्यकर्म पालकमंत्री गिरीश महाजन यांनी घ्यावे, असे आवाहन भुजबळ यांनी केले. यानुसार मांजरपाडा प्रकल्पात पुढील पावसाळ्यात पाणी अडवून उद‌्घाटन करू, अशी ग्वाही महाजन यांनी दिली. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी सप्तशंृग गड विकासासाठी २५ कोटी रुपयांंचा प्रस्ताव सादर केला अाहे. त्यास भाविकांसाठी निर्मलवारीसाठी निधी द्यावा, अशी मागणी केली.

बातम्या आणखी आहेत...