आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्यात झोपडपट्टीला लागली भीषण आग, अनेक झोपड्या जळाल्या लाखोंचे नुकसान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- मार्केटयार्ड येथील आंबेडकरनगर झोपडपट्टीत आज (शनिवारी)  सकाळी 10 वाजता भीषण आग लागली आहे. अग्निशामक दलाच्या 18 फायरगाड्या आणि 3 वाटर टॅंकर घटनास्थळी पोहचले आहेत. यासोबत खाजगी 10 टॅंकर दोन जेसीबी आणि चार अॅम्बुलेंस ही पोहचल्या आहेत. या आगीत लाखोंचे नुकसान झाले असून आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र कळू शकले नाही. 

 

अग्निशमन दलाच्या मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांसह इतर वरिष्ठ अधिकारी व किमान 60/70 जवानांनी नियंत्रणात आणली. सध्या कुलिंगचे काम सुरु आहे. घटनास्थळी 3/4 सिलेंडर फुटल्याची माहितीम स्थानिकांनी दिली आहे.  अग्निशमन दलाच्या एका जवानाला धुरामुळे त्रास झाल्याने रुग्णालयात रवाना करावे लागले.  आगीमध्ये कोणतीही जिवितहानी किंवा कुणी जखमी झालेले नाही. 

बातम्या आणखी आहेत...