आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चेन्नई सुपर किंग्जच्या प्रेमापोटी खास ट्रेनने पुण्यात पोहचले चाहते, RR बरोबर रंगणार सामना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील स्टेडिअमवर आज रात्री आयपीएल-11 चा चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान राॅयल्स यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यासाठी काल चेन्नईहून चाहत्यांची खास ट्रेन पुण्याला रवाना झाली होती. तिचे आज सकाळी पुणे स्टेशनवर आगमन झाले आहे. ट्रेनचे स्टेशनवर आगमन होताच चाहत्यांनी एकच जल्लोष केला.

 

 

कावेरी पाणी वाटप प्रश्नावरून रद्द झालेले आयपीएलचे सामने पुण्यात हलविण्यात आले.

पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर आज हा सामना होणार आहे. चेन्नईतील चाहत्यांना याचा आनंद लुटता यावा यासाठी चेन्नई सुपर किंग्ज व्यवस्थापनानं खास ट्रेनची व्यवस्था आज केली होती. ही ट्रेन काल चेन्नईमधील सेंट्रल रेल्वेस्टेशनवरून पुण्याकडे रवाना झाली होती. ती आज पुणे स्थानकावर पोहोचली. या ट्रेनमधून चेन्नईतील अनेक चाहते आज पुण्यात दाखल झाले होते. चाहत्यांचा पिवळ्या रंगाचा टीशर्ट लक्ष वेधून घेत होता. 

बातम्या आणखी आहेत...