आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसिद्ध कवयित्री विमल लिमये यांचे निधन, पुण्यात 88व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - प्रसिद्ध कवयित्री विमल लिमये यांचे गुरुवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 88 वर्षाच्या होत्या. आज (शुक्रवारी) सकाळी दहा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


‘घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती’ ही त्यांची अत्यंत गाजलेली कविता आहे. काही दशकांपूर्वी पुण्यातील एका नियतकालीकात प्रकाशित झालेल्या त्यांच्या या कवितेची लोकप्रियता एवढी वाढत गेली, अनेक ठिकाणी या कवितेच्या कढव्याचे पोस्टर्स दिसले. प्रख्यात संगीतकार श्रीधर फडके यांनी या कवितेला चाल दिली होती. या कवितेमुळे त्यांनी मराठी माणसाच्या मनात घर केले. झरोका, अंत:स्वर, प्रसाद हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. 

 

त्यांची कविता...

 

घर असावे घरासारखे
नकोत नुसत्या भिंती
इथे असावा प्रेम-जिव्हाळा
नकोत नुसती नाती

 

त्या शब्दांना अर्थ असावा
नकोच नुसती वाणी
सूर जुळावे परस्परांचे
नकोत नुसती गाणी

 

त्या अर्थाला अर्थ असावा
नकोत नुसती नाणी

अश्रूतुनही प्रीत झरावी
नकोच नुसते पाणी

 

या घरट्यातुन पिल्लू उडावे
दिव्य घेऊनि शक्ती

आकांक्षांचे पंख असावे
उंबरठ्यावर भक्ती

 

बातम्या आणखी आहेत...