आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तलाकमुळे शिक्षा होणार असेल तर तुलाही संपवतो; कोर्ट आवारात पत्नीच्या अंगावर पेट्रोल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे -  पोटगीच्या दाव्यासाठी न्यायालयात आलेल्या पत्नीला घटस्फोटाची मागणी करणाऱ्या पतीला पत्नीने नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या पतीने “ट्रिपल तलाक कायदा लवकरच होणार असून त्यानुसार मला शिक्षा झाल्यास माझे आयुष्य उद्ध्वस्त होईल आणि माझे आयुष्य उद्ध्वस्त होणार असेल तर मी तुझेही आयुष्य उद्ध्वस्त करतो’ असे म्हणत खिशात आणलेली पेट्रोलची बाटली पत्नीच्या अंगावर ओतून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

 

ही घटना पुण्यातील कौटुंबिक न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर मंगळवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली. सोहेल लतीफ पठाण (२६, हडपसर, पुणे) नामक पतीवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सोहेलचे शिवाजीनगर येथे पेंटिंगचे दुकान आहे, तर आरबीन ही आबेदा इनामदार कॉलेजमध्ये बीकॉमच्या पहिल्या वर्षात शिकत आहे.  सोहेल व आरबीन यांचा मे २०१५ मध्ये विवाह झाला होता. त्यानंतर एक वर्ष सुरळीत गेले व घरगुती कारणावरून त्यांच्यात वाद होत होते. त्यामुळे आरबीन माहेरी गेली. मात्र, नातेवाईकांकडे तगादा लावून सोहेलने तिला पुन्हा घरी आणले. 

 

त्यानंतर काही दिवस  चांगले राहिल्यानंतर मार्च २०१५ मध्ये त्यांनी अारबीनला अचानक एकतर्फी तोंडी तिहेरी तलाक देऊन निघून गेला. मात्र, आरबीनला हा घटस्फोट मान्य नाही. त्यानंतर तिने पोटगीच्या मागणीसाठी कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल केला. दरम्यान, तिने अनेकदा पोलिसांत सोहेलविरोधात धमकी दिल्याप्रकरणी तक्रारी दिल्या.  

 

घटना कशी घडली   
मंगळवारी दुपारी पोटगीची तारीख होती. त्यामुळे आरबीन आणि सोहेल कौटुंबिक न्यायालयात आले होते. सोहेलने काही महत्त्वाचे बोलायचे असल्याचे सांगून आरबीनला न्यायालयातून खाली आणले. त्यानंतर न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरच दावा मागे घेण्यासाठी तिच्याशी वाद घालायला सुरुवात केली. काही कळायच्या आतच त्याने पेट्रोलने भरलेली बाटली काढून ते आरबीनच्या अंगावर आेतून पेटवण्याचा प्रयत्न केला.

बातम्या आणखी आहेत...