आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात ब्युटी पार्लर चालविणार्‍या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- ब्युटी पार्लर चालविणार्‍या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास मोशी प्राधिकरणमध्ये घडली. रोहिणी राजेंद्र अष्टेकर (वय-35, रिद्धी-सिद्धी संस्कृती अपार्टमेंट, सेक्टर नं. 6, मोशी प्राधिकरण, पुणे) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

 

मृत रोहिणी अष्टेकर ब्युटी पार्लर चालवत होत्या तर त्यांचे पती राजेंद्र अष्टेकर एका खासगी कंपनीत नोकरीला आहेत. आज सायंकाळी चारच्या सुमारास रोहिणी यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

 

मृतदेहाजवळ रक्त सांडल्याचे आढळून आल्याने ही आत्महत्या नसून ही हत्या असल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. रोहिणी आणि राजेंद्र यांना 12 वर्षांची एक मुलगी आणि 8 वर्षांचा मुलगा आहे. पुढील तपास भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक हेमंत कोकणी करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...