आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात व्यावसायिकावर गोळीबाराचा प्रयत्न फसला; पिस्तुलमधून गोळी न सुटल्याने अनर्थ टळला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- देहूरोड किवळे येथे एका व्यावसायिकावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. परंतु पिस्तुलामधून गोळी न सुटल्याने मोठा अनर्थ टळला. कात्रज बायपास रोडवर किवळे येथे लेखा फार्ममागे असलेल्या एका फार्महाऊसवर ही घटना घडली आहे. दादा तरस असे व्यावसायिकाचे नाव असून अज्ञात हल्लेखोर पसार झाले आहे. आज (शनिवार) दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली.

 

दादा तरस हे फार्महाऊसवर मित्रांसोबत गप्पा मारत होते. चेहर्‍यावर रुपाल बांधून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी पिस्तुलामधून तरस यांच्याच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोळी फायर न झाल्यामुळे तरस हे थोडक्यात वाचले. नंतर हल्लेखोरांना फरार होण्यात यश आले. देहूरोड पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तरस यांनी सांगितले की, दोघांच्या पाठीवर बॅग होती. ते अचानक फार्ममध्ये घुसले आणि तरस यांच्या दिशेने पिस्तूलामधून गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. परंतु ‍पिस्तूलामधून गोळी सुटली नाही. तरस आणि त्यांच्या मित्रांनी प्रसंगावधान राखून सुरक्षित ठिकाणी धाव घेतली!

 

घटनास्थळी आढळली 0.9 एमएमची दोन काडतुसे...
पोलिसांना घटनास्थळी 0.9 एमएमची दोन काडतुसे आढळूनन आली आहेत. हल्ला फसल्याचे पाहाताच हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. उपविभागीय पोलिस अधिकारी गणपतराव माडगूळकर, पोलिस निरीक्षक अरूण मोरे, सहाय्यक निरीक्षक विनोद घोळवे, उपनिरीक्षक मनोज पवार यांनी पथकासह धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचे फोटो

बातम्या आणखी आहेत...