आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये बॉटनीच्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या हॉस्टेल क्रमांक 3 मध्ये विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. रेश्मा गायकवाड असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. या घटनेनंतर विद्यापीठ परिसराच उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.

 

सूत्रांनुसार, बॉटनीच्या (वनस्पती शास्त्र) द्वितीय वर्षाला शिकणार्‍या रेश्मा गायकवाड हिने हॉस्टेल क्रमांक 3 च्या रुम क्रमांक 50 मध्ये गळफास लावून आत्महत्या केली. रेश्मा मुळची शिरूर तालुक्यातील आहे. तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत अद्याप माहिती समजू शकली नाही.

बातम्या आणखी आहेत...