आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कठूआ अत्याचार...पिंपरी-चिंचवडच्या महिलांनी पंतप्रधानांना पाठविल्या बांगड्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- उन्नाव, कठूआ येथील पीडित मुलींवर घडलेल्या अत्याचारामुळे देशात असंतोषाचे वातावरण पसरले आहे. मात्र, या संदर्भात भाजपच्या महिला मंत्र्यानी अद्याप कोणतीही भूमिका घेतली नाही, याचा निषेध म्हणून पिंपरी चिंचवड शहरातील महिलांनी थेट पंतप्रधान कार्यालयाला बांगड्या पाठविल्या आहेत.

 

जम्मू काश्मिरमधील कठूअा येथील आठ वर्षांच्या मुलीवर आणि उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये भाजप आमदाराने मुलीवर केलेल्या अत्याचारामुळे देशात सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे. मात्र भाजपच्या कोणत्याही महिला मंत्र्यानी या संदर्भात सहानुभीती दर्शविली नाही. मंत्र्यांना दुसऱ्यांच्या मुलीचेे दुःख दिसत नाही का? असा सवाल करत महिलांनी थेट पंतप्रधान कार्यालयाला बंगड्यांची भेट पाठविली आहे.

 

भाजप सरकारचा निषेध नोंदवत तसेच पीडित मुलींना न्याय मिळण्यासाठी आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी यावेळी महिलांकडून करण्यात आली. याप्रसंगी संगिता शहा म्हणाल्या की, देशात महिला, मुलींची सुरक्षा धोक्यात आली असून लहान मुलींवर नराधम अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. कठूआ आणि उन्नाव प्रकरणात भाजपच्या महिला मंत्र्यांनी कोणतीही भूमिका घेतली गेली नाही. त्यामुळे देशातील महिला, मुलींच्या सुरक्षेविषयी मंत्री संवेदनशील दिसत नाहीत. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील महिलांनी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदींना बांगड्या पाठवत निषेध व्यक्त केला आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो...

बातम्या आणखी आहेत...