आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन महिन्यांपूर्वी झाला होता विवाह, शुल्लक कारणावरून तरुणाची पुण्यात आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पत्नीसोबत भांडण झाल्याच्या शुल्लक कारणावरून निगडी येथे नवविवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना आज (सोमवार) पहाटे साडेचार चारच्या सुमारास घडली. श्रावण गोरख कुसाळकर असे मृत तरुणाचे नाव आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत श्रावण कुसाळकर (वय-26, रा.राहुल नगर, ओटा स्कीम निगडी) याचे पत्नी निता कुसाळकर (वय-22) हिच्यासोबत काल (रविवार) रात्री कडाक्याचे भांडण झाले होते.

 

मद्यपान करून आला होता श्रावण..

श्रावण हा रविवारी मद्यपान करून घरी आला होता. त्याने पत्नीला शिवगाळ केली तसेच मारहाणही केली. पती-पत्नीचे भांडण ऐकून खालच्या मजल्यावर राहणारी निताची बहीण  आली आणि ती निताला घेऊन गेली. याचा राग येऊन श्रावणने सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली, असावी असा पोलिसांना संशय आहे.

 

दोन महिन्यांपूर्वी झाला होता विवाह..

श्रावण आणि निताचा दोन महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. याघटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...