आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुसती साहित्य संमेलन भरवू काय फायदा; मराठी माणूस टिकला तर मराठी भाषा टिकेल- राज ठाकरे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली- नुसती साहित्य संमेलन भरवू काय फायदा, मराठी माणूस टिकला तर मराठी भाषा टिकेल, मराठी भाषेसाठी साहित्यिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी केले. औदुंबर साहित्य संमेलनाच्या समारोपात राज ठाकरे बोलत होते.

 

केवळ एक दिवस साहित्यिकांचा सन्मान करायचा, परंतु थोर साहित्यिकांचे साहित्य वाचणार नाही तर केवळ साहित्य संमेलन भरवून काय फायदा, असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

 

नरेंद्र मोदींवर साधला निशाणा..
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत राज ठाकरे म्हणाले की, दक्षिणेतील तीन भाषांना अभिजात दर्जा मिळाला, पण मराठीला अजून भाषेचा अभिजात दर्जा मिळाला नाही. कदाचित गुजराती भाषेला हा दर्जा मिळू शकतो, त्यांना तर अर्जही करण्याची गरज नाही.

 

'मी विरोधासाठी विरोध करत नाही. महाराष्ट्रातील शहरे गिळली जात आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळणार, असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला. बुलेट ट्रेनसाठी मुंबई- अहमदाबादच का? असा थेट सवालही त्यांनी यावेळी केला.

 

राजकीय भिंतींसह सगळ्या जातीच्या भिंती पाडा...  
कमला मिलच्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या गुजराती लोकांसाठी पंतप्रधानांनी ट्‍वीट केले. परंतु इतर ठिकाणच्या दुर्घटनेवेळी त्यांचे ट्‍वीट दिसले नाही. महाराष्‍ट्र तब्बल 350 वर्षे पारतंत्र्यात होता. ते केवळ बेसावध राहिल्याने. आज आपण पारतंत्र्यात आहोत, तेही केवळ बेसावध असल्याने. आजची वेळ आहे. परंतु ही वेळ निघून गेली तर पश्चाताप करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे राजकीय भिंतींसह सगळ्या जातीच्या भिंती पाडायला हव्यात, असेही राज ठाकरेंनी सांगितले.

 

दरम्यान, राज ठाकरे सांगली जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत. महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजीत कदम यांनी राज ठाकरे यांच्याशी बंद खोलीत चर्चा केली. उभय नेत्यांमध्ये तब्बल 20 मिनिटे चर्चा झाली. परंतु या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... राज ठाकरे यांच्या सांगली दौर्‍याचे फोटो

बातम्या आणखी आहेत...