आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरची 12 मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी येथे एका महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरने 12 मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. पल्लवी उदयन मुजुमदार (वय-30, रा.पार्कस्ट्रीट, काळेवाडी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाचा अधिक तपास वाकड पोलिस करीत आहेत.

 

सूत्रांनूसार,पल्लवी मुजुमदार दुपारी एक वर्षाच्या मुलाला हॉस्टिलमध्ये घेऊन गेल्या होत्या. घरी परत आल्या तेव्हा त्यांची सासू घरी होत्या. काही कळण्याच्या आला पल्लवी यांनी इमारतीच्या 12 मजल्यावरील डक्टमधून उडी घेतली. यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने हॉस्पिटलला हलवण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

 

हिंजवडीतील एका खासगी कंपनीत पल्लवी या सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होत्या. त्यांचे पती देखील सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...