आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या, 3 जण पोलिसांच्या ताब्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- सिहंगड रोड परिसरात एका तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्‍यात आली आहे. ही घटना पूर्ववैमन्यस्यातून झाल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांनी या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतले आहे. अभिषेक बाळासाहेब पोकळे (वय-25) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

 

पोलिसांनी याप्रकरणी विशाल सेवकानंद वाघ (वय-29), सुधीर शिकांत घुगे (वय-32) व विकास विश्वनाथ पोकळे (वय-26) या तिघांना ताब्यात घेतले आहे.

 

काय आहे हे प्रकरण?

- सूत्रांनूसार, अभिषेक आणि आरोपींमध्ये तीन महिन्यापूर्वी वाद झाला होता. याप्रकरणी सिहंगड पोलिस स्टेशनला परस्पर गुन्हे दाखल आहेत.

- रविवारी संशयित आरोपी आणि फिर्यादी हे एकत्र दारू पित बसले होते. आरोपींनी पूर्वीच्या वादावरून मध्यरात्री दोन वाजता अभिषेक याच्या डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करून पसार झाले.

- घटने नंतर पोलिसांनी संशयित आरोपींचा शोध घेऊन तिघांना ताब्यात घेतले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...