आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंतर्गत न्यायालयीन वाद चव्हाट्यावर अाणणे चुकीचे; माजी न्या.पी.बी. सावंत यांचे मत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- सर्वाेच्च न्यायालयाच्या चार न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेत अप्रत्यक्षपणे सरन्यायाधीशांच्या भूमिकेवर व निष्ठेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले अाहे. देशाच्या इतिहासात प्रथमच असा प्रकार घडल्यामुळे त्यावर उलटसुलट प्रतिक्रियाही उमटत अाहेत.  

 
माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत म्हणाले की, ‘सर्वाेच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी थेट पत्रकार परिषद का घेतली यामागील नेमके कारण स्पष्ट नाही. न्यायालयीन व्यवस्थेबाबत त्यांना काही अाक्षेप असतील तर त्याबाबत लेखी पत्र त्यांनी सर्वाेच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना दिले पाहिजे. न्यायाधीशांची गळचेपी हाेत असल्याची बाब अथवा इतर वाद चव्हाट्यावर अाणणे चुकीचे अाहे. यामुळे लाेकांचा न्यायालयीन व्यवस्थेवरील विश्वास उडेल. याप्रकरणी सरकार अथवा इतर काेणी तातडीने मध्यस्थी करणे याेग्य अाहे.  सरन्यायाधीश व सर्वाेच्च न्यायालयाचे इतर न्यायमूर्ती यांच्यात सुसंवाद घडवून याप्रकरणी चर्चा करून या वादावर लवकर मार्ग काढावा. न्यायालयासमाेर सर्वजण समान असून न्यायहिताची बाजू मांडणे महत्त्वपूर्ण अाहे.’  


अराजकाकडे वाटचाल : राज ठाकरे  
मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, ‘आज सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी जे सांगितले, ते फारच गंभीर आहे. देशातील सर्व यंत्रणांवर सरकारचा किती दबाव आहे, हे समजण्यास ही घटना पुरेशी आहे. याअगोदर गुजरातमध्ये निवडणूक आयोगावर सरकारचा कसा दबाव होता, हे आपण पाहिले होते. एकूणच या सर्व बाबी पाहता आपण अराजकाकडे चाललो आहे, हे नक्की.’

 

लोकशाहीसाठी दुर्दैवी घटना : अण्णा हजारे 
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले, ‘चार वरिष्ठ न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेऊन उपस्थित केलेले मुद्दे अतिशय गंभीर आहेत. न्यायमूर्तींवर जर ही वेळ येत असेल, तर सर्वसामान्यांचे काय? देशातील लोकशाही धोक्यात आल्याचे हे द्योतक आहे. सर्वाेच्च न्यायालय स्वायत्त आहे. त्यांच्यावर दबाव येणे दुर्भाग्यपूर्ण असून आजचा दिवस लोकशाहीसाठी दुर्दैवीच म्हणावा लागेल. न्यायमूर्तींनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची गांभीर्याने चौकशी होणे आवश्यक आहे. न्याययंत्रणा मजबूत असेल, तरच लोकांना न्याय मिळू शकेल.’

बातम्या आणखी आहेत...