आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायगुण चांगला नाही म्हणत जवानाकडून पत्नीला घटस्फाेट; न्यायालयाच्या आदेशानंतरही पोटगी नाहीच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुणे जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबातील जवानाने लग्न झाल्यानंतर नवविवाहित पत्नीचा पायगुण चांगला नसल्याचे सांगत घटस्फाेटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला अाहे. तसेच पत्नीला न्यायालयाने सांगितलेली पाेटगी न देता अासाम येथे स्वत:ची जाणीवपूर्वक बदली करून घेत नाेकरीच्या ठिकाणी वारस म्हणून अार्इचे नाव लावत पत्नीला बेदखल केल्याचा प्रकार घडला अाहे. 


अजय व शीतल (नाव बदलले अाहे) यांचे लग्न डिसेंबर २०१० मध्ये बारामती येथे झाले. शेतकरी कुटुंबातील अजय हा लष्करात लान्स नार्इक पदावर कार्यरत अाहे, तर शीतलचे १२ वी विज्ञान शाखेपर्यंत शिक्षण झाले असून ती गृहिणी अाहे. लग्न झाल्यानंंतर अाठ दिवसांनंतर प्रथमच शीतल माहेरी गेली असता अजयच्या कुटुंबीयांनी पती-पत्नीत संशयाचे धुके निर्माण करण्यास सुरुवात केली. शीतल माहेरी गेली असताना जानेवारी २०११ ला अजयचा अपघात हाेऊन ताे वानवडी लष्करी रुग्णालयात एक महिना दाखल झाला. मात्र, याबाबतची काेणतीही माहिती शीतलला देण्यात आली नाही. आजारातून बरे झाल्यानंतर अजय ड्यूटीवर हजर हाेण्यासाठी गेला. 'नवविवाहित पत्नी कुटुंबीयांसाठी अाणि अजयसाठी शुभ नाही, अामच्या मुलापासून लांब राहा', असे सांगून सासरच्यांनी पतीची भेट घेण्यापासून तिला राेखले. मात्र, त्यानंतरही शीतल सासरी अाली असता तिला वेगळ्या खाेलीत राहण्यास सांगत तिच्याकडून सर्व घरकाम करून घेत तिला शेतात जबरदस्तीने राबवून घेतले. काही दिवसांनंतर तिला घरातून हकालून दिल्याने ती माहेरी राहण्यास गेली. 


विलंबाने न्यायदानाचाही फायदा नाही
शीतलच्या वकील सुप्रिया काेठारी म्हणाल्या, न्यायदान प्रक्रिया शिथिल असल्याने वेळेत न्याय मिळत नाही. अजय याने शीतलसाेबत लग्न केले. मात्र, तिला वैवाहिक सुख दिले नाही, पाेटगी दिली नाही. नाेकरीच्या ठिकाणी वारस म्हणून पत्नीएेवजी अाईचे नाव लावले. दुसऱ्या विवाहासाठी मुली पाहत अाहे. अाता आर्मी वाइफ वेल्फेअर असाेसिएशनकडे अजयविराेधात दाद मागू. 


अासामात करून घेतली जवानाने बदली 
अजयने पत्नीचा पायगुण शुभ नसल्याचे सांगत घटस्फाेटासाठी सासवड न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, न्यायालयाने याप्रकरणी घटस्फाेटाचे कारण याेग्य नसल्याचे सांगत त्याची याचिका फेटाळून लावली. तसेच पत्नीच्या दैनंदिन खर्चासाठी महिना पंधराशे रुपये पाेटगी अाणि घरखर्चाला तीन हजार रुपये देण्याचे अादेश दिले. मात्र, न्यायालयाने निकाल देऊन वर्षाचा कालावधी उलटूनही अद्याप पत्नीला अजयने पाेटगी न देता स्वत:ची बदली अासामात करून घेतली अाहे. 

बातम्या आणखी आहेत...