आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरी चिंचवडमध्‍ये ब्युटी पार्लर चालविणा-या महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 पिंपरी चिंचवड- येथील मोशी प्राधिकरणमध्ये ब्युटी पार्लर चालविणा-या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्‍याची घटना सोमवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास  घडली. रोहिणी राजेंद्र अष्टेकर (वय 35, रिद्धी-सिद्धी संस्कृती अपार्टमेंट, सेक्टर नं. 6, मोशी प्राधिकरण, पुणे) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.


मयत रोहिणी अष्टेकर ब्युटी पार्लर चालवतात तर त्यांचे पती राजेंद्र अष्टेकर एका खाजगी कंपनीत काम करतात. मृतदेहाजवळ रक्त सांडल्याचे आढळून आले होते, त्यामुळे हा खून असल्‍याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र ही आत्महत्या असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.  आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. रोहिणी आणि राजेंद्र यांना 12 वर्षाची एक मुलगी आणि 8 वर्षाचा मुलगा आहे. अधिक तपास भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हेमंत कोकणी करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...