आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरेंद्र गडलिंग यांना २५ जूनपर्यंत पाेलिस काेठडी; रुग्णालयातून पुन्हा कोठडीत होणार रवानगी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून अटकेत असलेले अॅड.सुरेंद्र गडलिंग यांना न्यायालयाने २५ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. यापूर्वी काेठडीदरम्यान तब्येत बिघडल्याने त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात अाले हाेते. मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. 


पाेलिसांनी न्यायालयात सांगितले की, गडलिंग हे सीपीअाय (एम) या बंदी घालण्यात अालेल्या दहशतवादी संघटनेशी निगडित असून ते त्यांना वेळाेवेळी मार्गदर्शन करत अाहेत. नक्षलवाद्यांकरिता पत्रव्यवहार, पत्रके, नक्षली साहित्याचा पुरवठा ते करतात. तसेच त्यासाठी निधीची उभारणी करणे, चळवळीकडे तरुणांना अाकर्षित करणे अाणि नक्षलवाद्यांच्या बैठका घडवून अाणण्यात त्यांचा सहभाग अाहे. सूरजागड याठिकाणी झालेल्या दंगलीत त्यांचा सहभाग असून वेगवेगळ्या हिंसक कारवार्इत ते सहभागी अाहेत. त्यांचे घर व कार्यालयावरील छाप्यात ८१ कागदपत्रे अातापर्यंत जप्त करण्यात अाली असून त्यावरुन त्यांचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे स्पष्ट हाेत अाहे. दरम्यान, बचाव पक्षाचे वकील सिध्दार्थ पाटील व शहीद अख्तर यांनी पाेलिसांचे अाराेप फेटाळून लावले आहेत. त्यांनी दावा केला की, विना कागदपत्राचे निराधार अाराेप पाेलिस करत असल्याचा युक्तिवाद केला. सूरजागड दंगलीच्या दाेषाराेपपत्रात अॅड. सुरेंद्र गडलिंग यांचे नाव आहे. 

बातम्या आणखी आहेत...