आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँक अधिकाऱ्यांच्या जामिनावर पाेलिस, सरकार पक्षात मतभेद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी यांना बेकायदेशीररीत्या कर्ज दिल्याप्रकरणी पाेलिसांनी बँक अाॅफ महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय संचालक, माजी अध्यक्ष, कार्यकारी संचालक, क्षेत्रीय व्यवस्थापक यांना अटक केली अाहे. बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडील तपास पूर्ण झाला अाहे. बहुतांशी कागदपत्रेही जप्त करण्यात अाली आहेत. त्यामुळे सशर्त त्यांना जामीन देण्यास हरकत नाही, असा अर्ज तपास अधिकाऱ्यांनी विशेष न्यायाधीश अार.एन.सरदेसाई यांच्याकडेसादर केला. मात्र, पाेलिसांचीबाजू मांडणारे विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी न्यायालयात अधिकाऱ्यांना जामीन देण्यास विराेध दर्शवला. 


अधिकाऱ्यांच्या अटकेनंतर या प्रकरणात राजकीय अाणि बॅंंकिंग क्षेत्रातून माेठ्या प्रमाणावर दबाव अाल्याने पाेलिस व सरकारी वकील यांच्यातच विसंवाद असल्याचे गुरुवारी न्यायालयात स्पष्ट झाले. सरकारी वकील चव्हाण न्यायालयात दाेन तासानंतर दाखल झाल्याने पाेलिसांची धावपळ उडाली. दरम्यान, याअधिकाऱ्यांच्या जामिनावर अाता शुक्रवारी निर्णय घेण्यात येणार अाहे. 


सरकारी वकील चव्हाण म्हणाले, पाेलिसांची बाजू लेखी स्वरूपात न्यायालयात सादर केली असली तरी माझी वैयक्तिक भूमिका जामिनास विराेधाची अाहे. न्यायालयाने माझा विराेध रेकॉर्डवर घेऊ नये. कारवाईच्या शेवटच्या टप्प्यावर जामिनासाठी अर्ज करणे याेग्य नाही. पुरेसा वेळ अाधी हाेता त्यावेळीच जामिनासाठी अर्ज करणे अपेक्षित हाेते. बँक अधिकाऱ्यांची अटक याेग्य हाेती. त्यांच्याविराेधात पुरावे असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात अाली. 


'मराठे यांच्यासारखेच इतरांनाही जामीन द्या' 
बचाव पक्षाचे अॅड. निंबाळकर म्हणाले, 'महाराष्ट्र बँकेचे कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार गुप्ता हे सहसचिव दर्जाचे अधिकारी असून बँकेच्या एमडी पदाच्या मुलाखतीसाठी त्यांना बाेलवले जाऊ शकते. त्यांची पत्नी अंध असल्याने त्यांच्यावर काैटुंबिक जबाबदारी अाहे. क्षेत्रीय संचालक देशपांडे हे अहमदाबाद येथील असून कर्ज मंजुरीवेळी ते पुण्याचे क्षेत्रीय व्यवस्थापक हाेते. डीएसके यांना राष्ट्रीयीकृत तीन बँकांनी कर्ज मंजूर केल्यानंतर माजी अध्यक्ष मुहनाेत यांनी ५० काेटींचे कर्ज मंजूर केले हाेते. तिघांना बँकेचे चेअरमन मराठे यांच्याप्रमाणे जामीन द्यावा.' 

बातम्या आणखी आहेत...