आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाेलिस ठाण्यात न जाता कुठूनही करता येईल तक्रार;‘महाराष्ट्र सिटिझन पाेर्टल’ अॅपची निर्मिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पोलिस ठाण्यात तक्रार घेतलीच जात नाही. तक्रार करून महिने उलटले, पण तपास काहीच नाही...या पोलिसांबद्दलच्या सामान्य माणसाच्या प्रमुख तक्रारी आहेत. मात्र, यापेक्षाही सर्वात मोठी अडचण असते ती म्हणजे पोलिस ठाण्याची पायरी चढायचीच भीती सामान्यांना वाटत असते. या सगळ्या तक्रारी आणि अडचणींवर मात करणारी व्यवस्था सीआयडीने केली.  ‘महाराष्ट्र सिटिझन पोर्टल’ या अॅपमुळे कुठूनही मोबाइलवरून तक्रार नोंदवता येईल. या तक्रारीची पोच लगेच एसएमएसद्वारे मिळणार आहे. एवढेच नव्हे, तर या तक्रारीचे पुढे काय झाले, याचाही मागोवा याच अॅपवरून घेता येईल. या तक्रारीवर काय ‘अॅक्शन’ घेतली याचे उत्तर कळवण्याची जबाबदारीही पोलिसांवर टाकण्यात आली आहे. अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय कुमार यांच्या पुढाकारातून या अॅपची निर्मिती करण्यात अाली. 

 

पोलिसांवरच वचक  
- एफआयआर पब्लिक डोमेनमध्ये येणार असल्याने त्यात बदल करता येणार नाही.  
- एफआयआर नोंदवल्याचा एसएमएस तक्रारदार, पोलिस अधिकाऱ्यांना जाईल.
- अाराेपपत्र दाखल करतानाचाही एसएमएस तक्रारदाराला मिळणार.  
- अदखलपात्र तक्रारीवर लगेच कारवाई सुरू करून माहिती द्यावी लागणार.  
- राज्यातल्या सर्व पोलिस ठाण्यांतल्या अटक, एफआयआरची माहिती घरबसल्या पाहता येईल.

 

तक्रारच नव्हे, ‘खबर’सुद्धा  
‘महाराष्ट्र पोलिस सिटिझन पोर्टल’ हे अॅप गुगल प्ले स्टोअरमधून विनामूल्य डाऊनलोड करून घेता येते. राज्यातली १ ११७ पोलिस ठाणी अॅपला जोडली आहेत. त्यामुळे राज्याच्या कोणत्याही भागातून अॅपवरून तक्रार नोंदवता येते. या अॅपमध्ये १० आणि पोर्टलवर २९ सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे मराठीतून तक्रार करण्याची सोय यात आहे. अॅपवरून घरबसल्या तक्रार करता येईलच, त्याशिवाय पोलिसांना ‘खबर’ही याच अॅपवरून देता येईल. ‘खबऱ्या’चे नाव यात गुप्त राहणार आहे.

 

तक्रार दाखल हाेताच पाेचपावती  
‘या अॅपद्वारे तक्रार केल्यास संदेश लगेच  तक्रारदाराला पाठवला जातो. तक्रार नोंदवल्याची सिस्टिम जनरेटेड पावती मिळणार आहे. तपासाची जबाबदारी संबंधित पोलिस निरीक्षकावर असल्याने त्याने ही तक्रार पाहणे अपेक्षित आहे. तक्रारी कोणत्या तारखेला, किती वाजता झाली याचा तपशील रेकॉर्ड होणार असल्याने पोलिस निरीक्षकाला तक्रारीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. ‘एफआयआर’ नोंदवण्यासाठी सहीची गरज असल्याने त्यासाठी मात्र पोलिस ठाण्यात यावे लागेल. ‘डिजिटल सिग्नेचर’ची सोय पुढच्या टप्प्यात हाेईल.

बातम्या आणखी आहेत...