आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी साहित्य संमेलन अध्यक्षांच्या संकेतस्थळाचे अाज पुण्यात लोकार्पण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- बडोदे येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख  यांच्या संकेतस्थळाचे लोकार्पण सोमवारी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते पुण्यातील साहित्य परिषदेत होणार आहे. प्रसिद्ध लेखक व समीक्षक संजय भास्कर जोशी या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 


साहित्य तसेच संस्कृतीचे जतन हे प्रामुख्याने संवादातून आणि तंत्रज्ञानाच्या कल्पक वापरातून होऊ शकते, या विचारातून विशेष संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे, असे लक्ष्मीकांत देशमुख यांनी या पार्श्वभूमीवर म्हटले आहे. याप्रसंगी ‘ई मराठी व साहित्य’ या विषयावर परिसंवाद होणार असून त्यात दीपक शिकारपूर, उदय पाचपोर, महेंद्र मुंजाळ, गिरीश लाड, सचिन इटकर, कुलभूषण बिरनाळे, संतोष देशपांडे यांचा सहभाग आहे. www.laxmikandeshmukh.com ही संकेतस्थळाची लिंक आहे. 

बातम्या आणखी आहेत...