आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुशीचा सर्वाधिक काळ पाण्याखाली योगा; ३ तास ७ मिनिटे २४ सेकंदांचा विश्वविक्रम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- सर्वाधिक काळ पाण्याखाली योगा करण्याचा विक्रम खुशी परमार या सोळा वर्षांच्या मुलीने गुरुवारी केला. २१० बारचा ऑक्सिजन सिलिंडर सोबत घेत खुशी पाण्यात उतरली आणि तब्बल तीन तास सात मिनिटे २४ सेकंद तिने अंडरवॉटर योगा सादर करत नव्या विक्रमाची नाेंद केली. केला. या दरम्यान ४० योगासनांच्या दोन सायकल्स (८० योगासने) तिने पूर्ण केल्या आणि त्याही फक्त दीडशे बार अाॅक्सिजन सिलेंडर वापरून... खुशीच्या या विक्रमाची नोंद आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जाणार आहे.


अपेक्षेपेक्षा जास्त वेळ याेगा करू शकले
खुशी म्हणाली,‘मी हा विक्रम करू शकेन, असा आत्मविश्वास आधीपासून वाटत होता. मी अडीच तासांचा कालावधी मनात ठरवला होता, पण प्रत्यक्षात त्यापेक्षाही बराच अधिक काळ मी पाण्याखाली योगा करू शकले. मी स्वत:च मला या परीक्षेला बसवले होते. त्यात चांगल्या प्रकारे यश मिळवले, याचा आनंद वाटतो.’

बातम्या आणखी आहेत...