आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेल्फी काढून युवकाने घेतला गळफास, चिट्ठीत लिहिले- जगण्याचा आला होता कंटाळा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- जगण्याचा कंटाळा आला म्हणून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चिंचवड मध्ये घडला आहे. या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी सेल्फी काढला आणि सुसाईड नोटही लिहून ठेवली. हा प्रकार रविवारी पहाटे उघडकीस आला.विनोद रमेश गोसावी (वय 19, रा. रुपीनगर, तळवडे, मूळ रा. शहादा, नंदुरबार), असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे


चादरीच्या तुकड्याचा तयार केला गळफास 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद आणि त्याचा भाऊ चिंचवडमधील एका कंपनीमध्ये काम करतात. शनिवारी सकाळी दोघेही कामावर गेले. पहिल्या शिफ्टनंतर दुपारी विनोद घरी आला. मात्र, त्याच्या भावाला दुस-याही शिफ्टला थांबावे लागले. रात्री दुसरी शिफ्ट संपल्यानंतर भाऊ घरी आला. त्याने बराच वेळ घराचा दरवाजा वाजविला. आतमधून कोणताही प्रतिसाद न आल्याने भावाने घराचा दरवाजा तोडला. तेंव्हा आतमध्ये विनोदने चादरीची कडा कापून त्याच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. 

 

गळ्याला फास लावून काढला सेल्फी 
कंपनीमध्ये मोबाईल फोन वापरण्यास बंदी आहे. त्यामुळे विनोदच्या भावाने आपला मोबाईल फोन घरीच ठेवला होता. त्या मोबाईलमध्ये विनोदने गळ्याला गळफास लावून सेल्फी काढला. तसेच त्याने एक चिट्ठी लिहून ठेवली. 'जीवनाचा कंटाळा आला आहे, म्हणून आत्महत्या करीत असल्याचे' त्या चिट्ठीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...