आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनाथ मुलांचे ‘अस्तित्व’ निर्माण करणारी शाळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - केंद्र सरकारने देशभर शिक्षण हक्क कायदा लागू केला असला तरी आजही समाजातील अनेक मुले शिक्षणापासून वंचित असल्याचे वास्तव आहे. एका बाजूला शिक्षणाच्या नावाखाली नवनवीन शिक्षण सम्राट उदयास येत असताना या वंचित मुलांपासून ‘वाघिणीचे दूध’ अजूनही कोसो दूर असल्याचे दिसून येते. अशाच वंचित, अनाथ मुलांना स्वखर्चाने हक्काचे शिक्षण देण्याचे व्रत एका युवकाने घेतले आहे, त्याचे नाव आहे संतोष वाघ.

प्रत्येकाला आयुष्यात मोठेपणी काहीतरी ध्येय प्राप्त करावयाचे असते. संतोषने मात्र जीवनात पैसे कमावून सुखाचे आयुष्य जगणे एवढ्यावरच मर्यादित ध्येय न ठेवता समाजासाठी काहीतरी योगदान द्यावे, असा निर्धार केला. यातूनच त्याने अनाथ, निराधार, माता किंवा पित्याचे छत्र नसलेल्या मुला-मुलींसाठी शाळा उभारण्याचा संकल्प केला. दरम्यान ऊसतोडणीच्या काळात स्थलांतरित होणा-या शेतक-यांच्या मुलांसाठी पुण्यातील ज्ञानप्रबोधिनीतर्फे साखर शाळा घेऊन मुलांना शिक्षणाचे धडे साखर कारखाना परिसरात दिले जात. याकामात हिरीरीने भाग घेत त्याने काहीकाळ काम केले होते, त्यामुळे अनाथ मुलांचा प्रश्न संतोषसमोर आला व त्याने आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही 2003 मध्ये गीतांजली देगावकर यांच्या साहाय्याने पुरंदर तालुक्यातील वीर या गावी ‘अस्तित्व प्रतिष्ठान’ शाळेची स्थापना केली. या शाळेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक साक्षर करण्यासाठी विशेष मोहिम राबवली.

वडिलांनी दिली जमीन
अनाथ मुलांचा शोध घेऊन सुरुवातीला वीरजवळील नवलेवाडीतील तीन खोल्यात शाळा सुरू करण्यात आली. परंतु त्याठिकाणी दरवर्षी तीस हजारे भाडे द्यावे लागत असल्याने आर्थिक मदतीसाठी वणवण फिरावे लागत होते. त्यामुळे संतोषला कसरत करावी लागत होती. एकेदिवशी अनपेक्षितपणे वडिलांनी संतोषसमोर प्रस्ताव मांडला की , ‘वडिलोपार्जित चार एकर जमिनीपैकी दोन एकर जमिनीवर आपण मुलांसाठी खोल्या बांधू’. आता इतर खर्च भागविण्यासाठी विविध संस्थाच्या मदतीने शाळा चालवून मुले घडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मुलांना बंधनात अडकवयाचे नाही
ज्या विषयांची आवड आहे त्याविषयाचे ज्ञान मुलांनी मिळवल्यास त्यांना यश अधिक मिळत असते. त्यामुळे आज शाळेत असलेल्या 40 मुलांपैकी कोणावरही ठराविक बंधन न ठेवता त्यांच्या कल्पनांना वाव दिला जात आहे. शाळेला जाणीवपूर्वक कंपाउंडमध्ये बंदिस्त केले नाही, कारण मुलांना कोणत्याही बंधनात अडकवयाचे नाही. मुलांच्या चेह-यावरील आनंद व आत्मविश्वास याची किंमत पैशात मोजता येणारी नसून ती जीवनात समाधान व प्रेरणा देते.’’
संतोष वाघ, अस्तित्व प्रतिष्ठान प्रमुख