आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमबीए प्रवेशासाठी आणखी एक संधी, सीईटीचा मार्ग मोकळा, 31 जुलैपर्यंत मुदत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(प्रातिनिधिक छायाचित्र)
पुणे- तंत्र शिक्षण संचालनालयाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतक राज्यातील हजारो रिक्त जागांसाठी सामाईक प्रवेश परीक्षा ( सीईटी) घेण्याचा असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ एमबीए इन्स्टिट्यूट (अम्मी)चा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार अम्मीने 21 जुलैपासून सीईटी अर्ज उपलब्ध करून दिले आहेत. याचबरोबर न्यायालयाने अम्मीला प्रवेशाचे वेळापत्रकही निश्चित करून दिले आहे. त्यानुसार एमबीएची सीईटी परीक्षा 3 ऑगस्ट रोजी तर, एमसीएची 2 ऑगस्ट रोजी परीक्षा होणार आहे.
अम्मीतर्फे गेल्या आठ वर्षापासून रिक्त जागांसाठी सामाईक प्रवेश परीक्षा घेतली जात आहे. परंतु या वर्षी प्रवेश नियंत्रण समितीने त्यांना मनाई केली होती. त्याला अम्मीने हायकोर्टात आव्हान दिले होते. मात्र, प्रवेश नियंत्रण समितीला हायकोर्टाने दणका घेत सर्व महाविद्यालये एकत्र येऊन रिक्त जागा भरण्यासाठी सामाईक प्रवेश परीक्षा घेऊन प्रवेश देणार असतील तर अडचण काय आहे अशी विचारणा करीत अशी एकतर्फी मनाई करता येणार नाही असे फटकारले. त्यामुळे अम्मीचा मार्ग मोकळा झाला. अम्मी या संस्थेशी राज्यातील सुमारे 353 व्यवस्थापन महाविद्यालये संलग्न आहेत. ज्यांना तंज्ञ शिक्षण संचालनालयाने घेतलेली सीईटी देता आली नाही त्यांना प्रवेशाची संधी मिळेल असे अम्मीने म्हटले आहे. याचबरोबर एमबीए महाविद्यालयातील रिक्त जागा भरल्या जातील. याचा फायदा या शैक्षणिक संस्था चालविण्यास फायदा होणार आहे. कारण यातील बहुतेक महाविद्यालये खासगी व विनाअनुदानित तत्त्वार चालवली जातात.
अधिक माहितीसाठी अम्मीच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. एमबीएची माहिती www.mahaammi.com तर, एमसीएची माहिती www.mamimaha.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 2 व 3 ऑगस्ट रोजी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) होईल तर 10 ऑगस्टला सीईटीचा निकाल जाहीर होईल. 10 ते 14 ऑगस्टदरम्यान प्रवेश घेता येणार आहेत. त्यानंतर प्रवेश प्रक्रिया बंद होईल. त्यामुळे ज्यांना तंत्र शिक्षण संचालनालयाची सीईटी देता आली नाही व एमबीए/एमसीए करायची इच्छा असेल त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.