आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यभरातील निम्मे धरण धोकादायक- विजय पांढरे, 33 जणांवर गुन्हे दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- टेमघर धरणाचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याप्रकरणी पौड पोलिस स्टेशनमध्ये 33 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. श्रीनिवास कन्सट्रक्शनचे 7 कर्मचारी, प्रोग्रेसिव्ह कन्स्ट्रक्शनचे 2 अधिकारी आणि जलसंपदाचे अधिकारी यांचा या 33 जणांमध्ये समावेश आहे.
राज्यातील निम्म्यापेक्षा अधिक धरणे धोकादायक परिस्थितीत आहेत, अशी धक्कादायक माहिती जलसंपदा विभागाचे माजी मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली. ‘राज्यातील सर्व धरणांचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थेकडून स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची आवश्यकता आहे, मात्र राजकीय पुढारी हे करतील असे वाटत नाही,’ असेही पांढरे म्हणाले. जलसंपदा विभागाचे वास्तव मांडण्याची सुसंधी असलेल्या माधवराव चितळे समितीने प्रत्यक्षात विभागातील भ्रष्टाचारावर पांघरूणच घातले, असा आरोपही पांढरे यांनी या वेळी केला. आम आदमी पक्षातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत पांढरे यांनी जलसंपदा विभागाचे वास्तव मांडले. आम आदमी पक्षाच्या राज्य समन्वयक प्रीती शर्मा मेनन व शहरप्रमुख राकेश चौधरी या वेळी उपस्थित होते.

धरणांना मंजुरी देणाऱ्या प्रस्तावावर कॅबिनेट मंत्र्यांची सही असते. धरणांत झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भात अभियंता आणि मुख्य अभियंता यांच्यावर गुन्हे दाखल करताना मंत्र्याला का वगळले जाते, असा प्रश्न पांढरे यांनी विचारला. जलसंपदा विभागाचे तत्कालीन मंत्री सुनील तटकरे व अजित पवार यांना पाठीशी घालण्याचे काम सध्याचे सरकार करत आहे, असेही ते म्हणाले.

धरणांची गळती ही गंभीर बाब असूनही सरकारी अधिकारी याबाबत जनतेची दिशाभूल करतात. धरणांतून आवश्यक गळतीपेक्षा कित्येक पट अधिक गळती होत आहे. धरणांना मूळ बळकटी देणे शक्य नसले तरी गळती नक्की कमी करणे शक्य आहे. नाशिकच्या ‘मेरी’ संस्थेत असताना मी राज्यातील धरणांची तपासणी केली होती. १३६ पैकी निम्म्याहून जास्त धरणे धोकादायक आहेत. धरणांना धोका नाही, या दाव्यात तथ्य नाही.

भोसले यांना वाचवण्याचा प्रयत्न
टेमघर धरणाला कोणताही धोका नाही, ते धरण सुस्थितीत असल्याचा दावा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. मात्र, वस्तुस्थिती समोर आल्यावर श्रीनिवास एंटरप्रायजेस आणि प्रोग्रेसिव्ह एंटरप्रायजेस या कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देताना अविनाश भोसले यांना वाचवण्यासाठी सोमा एंटरप्रायजेसला वगळण्यात आले, असा आरोप प्रीती शर्मा मेनन यांनी केला. दरम्यान, धरण बांधकामात निष्काळजी दाखवल्याने जलसंपदाच्या ३३ अधिकाऱ्यांवर पौड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टेमघरला धोका
चितळे समितीला मी ३५ मुद्दे असणारे पत्र पाठवले होते; पण त्याची दखल घेतली गेली नाही. धरणांच्या बळकटीसंदर्भातील चितळे यांचे विधान हास्यास्पद असल्याची टीकाही पांढरे यांनी केली. टेमघर आणि वरसगाव धरणाला धोका आहे. पानशेत आणि पवना धरणांवर गवत उगवले आहे. निसर्गप्रकोपात काही अनर्थ घडला तर मातीची धरणे वाहून जाऊ शकतात, हे दु:ख पुण्याने एकदा अनुभवले आहे, याचा उल्लेख पांढरे यांनी केला.
पुढील स्लाइड्सवर वाचा, चितळे समितीवरही केली टीका...काय म्हणाले विजय पांढरे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...