आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आप लढवणार महाराष्ट्र व हरियाणा विधानसभा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - दिल्लीतील यशानंतर आपसमोर मर्यादित उमेदवार उभे करून त्यांना विजयी करून आणणे किंवा देशभर उमेदवार उभे करणे हे दोन पर्याय होते. मात्र दीर्घकालीन लक्ष्य समोर ठेवून आपने देशभर लढण्याचा निर्णय घेतला. आता आगामी महाराष्ट्र व हरियाणा विधानसभा निवडणुका लढवणार असल्याचे आपचे नेते योगेंद्र यादव यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

केवळ देशात सत्तापरिवर्तन करणे हा आपचा उद्देश नसून राजकारणातील व्यवस्था परिवर्तन करण्यावर आमचा भर राहणार आहे. देशात कोठेही मोदी लाट नाही. आपच्या उमेदवारामुळे पुण्यात विद्यमान खासदार सुरेश कलमाडींना तिकीट नाकारले आहे. इतर कोणत्याही पक्षाचे नेते सर्वसामान्यांना सहज भेटण्याकरिता उपलब्ध होत नसल्याने आपच्या नेत्यांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढत असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत सत्ता स्थापन करताना जनतेच्या भावना लक्षात घेतल्या. मात्र, त्यानंतरच्या काळात जनतेला जी आश्वासने दिली त्याची पूर्तता होत नसल्याचे समजल्याने सत्तेत राहणे चुकीचे असल्याचे त्यांना वाटले. त्यामुळेच त्यांनी राजीनामा दिला. तिसरी आघाडी हा योग्य पर्याय नसल्याने त्यांना निवडणुकीनंतर कोणत्याही प्रकारचा पाठिंबा देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पुण्यात 25 लाखांचा निधी
पुण्यातील आपचे उमेदवार सुभाष वारे यांनी सांगितले की, पुणेकर जनतेने आतापर्यंत निवडणूक लढवण्यासाठी त्यांना 25 लाख रुपयांचा निधी दिला आहे. निवडणुकांचा सर्व खर्च रोखीने न करता आम्ही बँकेच्या माध्यमातून रीतसर करत आहोत. प्रचार समाप्तीपूर्वी एक दिवस आपचे एक हजार कार्यकर्ते पुण्यातील एक लाख घरांत आपची पत्रके पोहोचवण्याचे काम करणार आहेत.