आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • AAP News In Divya Marathi, D.S.. Kulkarni,Latest News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आप’ही चालते हायकमांडच्याच इशा-यावर- उद्योगपती डी. एस. कुलकर्णी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे-अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी जनसामान्यांच्या इच्छा-अपेक्षांवर चालते असा भास निर्माण करण्यात आला आहे. प्रत्यक्षात ‘आप’सुद्धा इतर पक्षांप्रमाणेच हायकमांडच्या इशा-यांवर चालते, अशा शब्दांत उद्योगपती डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांनी ‘आप’वर हल्ला चढवला.तिकिटाची अपेक्षा बाळगून कुलकर्णी यांनी जानेवारीत ‘आप’चे ऑनलाइन सदस्यत्व स्वीकारले आणि उमेदवारी अर्जसुद्धा भरला; परंतु दिल्लीतून वारे यांच्या नावाची घोषणा झाल्याने दुखावलेले कुलकर्णी यांनी ‘आप’ला टीकेचे लक्ष्य केले. नागपुरातील डॉ. रूपा कुळकर्णी यांच्यापाठोपाठ पुण्यातून कुलकर्णी यांनी केलेल्या टीकेचा रोख एकच असल्याने ‘आप’च्या पक्षीय रचनेबद्दल प्रश्न उपस्थित झाले.
‘जनतेची सेवा करण्यासाठी मला लोकसभेत जायचे आहे. खासदारच व्हायचे असते, तर मी 25-30 कोटी खर्चून यापूर्वीच राज्यसभेवर गेलो असतो,’ असे वादग्रस्त विधान ‘डीएसके’ यांनी केले.
आप’ नाटक कंपनी
‘आप’ने ऑनलाइन अर्ज मागवत एकीकडे खुलेपणाचा टेंभा मिरवायचा आणि दुसरीकडे गुपचूप निवड करायची, अशी नाटके करायला नको होती. पक्ष कोणताही असो, उमेदवार दिल्लीतून आधीच ठरलेला असतो. ‘आप’ही त्याला अपवाद नाही. तिकीट नाकारल्याचे दु:ख नाही; परंतु नाकारण्याचे कारण नीटपणे द्यायला हवे होते. वारे यांचे तिकीट आधीच ठरले होते, तर मग अर्ज मागवण्याचे नाटक कशाला?
- डी. एस. कुलकर्णी, उद्योगपती
पक्षाचा निर्णय
आपच्या स्थापनेपासूनच मी सक्रिय आहे. राष्ट्रीय सदस्य म्हणून गेल्या 3 महिन्यांपासून काम करतोय. जिल्हा समितीच्या आग्रहामुळे उमेदवारीसाठी अर्ज केला. 18 जणांनी पुण्यातून उमेदवारी मागितली; परंतु राज्यातल्या महत्त्वाच्या लढती पक्षाच्या नेतृत्त्वानेच लढाव्यात हा पक्षाचा निर्णय आहे. डीएसकेंनी पक्षाला सहकार्य करावे.प्रा. सुभाष वारे, ‘आप’चे पुण्यातील उमेदवार