आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अण्णांच्या राळेगणमध्ये \'आप\'च्या स्थापनेसाठी पुढाकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- राजकारण एका बाजूला व समाजकारण एका बाजूला असे म्हणत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षात सामील होण्यास नकार देणा-या अण्णा हजारेंच्या गावातच आता आम आदमी पक्षाची शाखा निघणार आहे. राळेगणसिद्धीतील माजी सरपंच गणपतराव औटी यांचे चिरंजीव लाभेश याने काही गावक-यांना धरून आपच्या शाखा स्थापन करणार आहेत. याचबरोबर औटी यांनी राळेगणनंतर पारनेर तालुक्यात पक्षाच्या शाखा काढण्याचा मनोदय केला आहे.
औटी परिवारात आणि अण्णा हजारे यांच्यात कसलीही धुसफूस नसताना औटी यांनी घेतलेल्या निर्णयामुळे आश्यर्च व्यक्त करण्यात येत आहे. येत्या 26 जानेवारी रोजी पारनेर येथे पक्षाची स्थापना होत आहे. याबाबतचे तसे फलकही लावण्यात आले आहेत. तसेच लाभेय यांनी फेसबुकच्या माध्यमांतून पक्षात सामील होण्याचे व उदघाटन कार्यक्रमाला येण्याचे आवाहन केले आहे.
पुढे वाचा, अण्णा शेतक-यांच्या प्रश्नांवर आंदोलन करणार...