आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुलत मामानेच केले भाच्याचे अपहरण; पोलिसांनी असा लावला अपहरणकर्त्याचा शोध, हे होते कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपहरणासाठी वापरण्यात आलेले वाहन. - Divya Marathi
अपहरणासाठी वापरण्यात आलेले वाहन.
पुणे- चुलत मामानेच भाच्याचे अपहरण केल्याचा प्रकार पुण्याजवळील चाकणमधील महाळुंगे या गावात घडला. जमिनीच्या वादातून हे अपहरण झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
सकाळी साडेसातच्या सुमारास मामासह 14 ते 15 जणांनी भाच्याचे अपहरण केले.
 
अपहरण झालेल्या युवकाच्या भावाला याची माहिती होताच त्याने काही अंतर त्यांचा पाठलाग केला. नंतर ते खेडच्या दिशेने गेले. चाकण पोलिसांना याची माहिती देताच वायरलेसवरून खेड पोलिसांना सतर्क करण्यात आले. तेव्हा खेड पोलिस स्टेशनच्या हद्दीत वाडा गावाजवळ नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी दोन्ही गाड्या अडवल्या. त्यापैकी 4 ते 5 जणांना ताब्यात घेण्यात आले तर उर्वरित जवळच्या रानात पळून गेले. मात्र त्यांचा ही शोध घेत आत्तापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली आहे. तर अद्याप दोघे फरार आहेत. विशेष म्हणजे स्थानिक नागरिकांनी पोलिसांना या कारवाईत मदत करत, त्या तरुणाची सुखरूप सुटका केली. 
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि व्हिडिओ
बातम्या आणखी आहेत...