आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्ता बदलूनही हिंदूंना न्याय नाही : अभय वर्तक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- ‘राज्यात, केंद्रात सत्ता बदलली; पण हिंदूंना न्याय मिळाला नाही. सनातन संस्थेच्या साधकांवरील अन्याय कायमच आहे. हिंदुत्ववादी सरकार निवडून दिले, त्याचे हे फळ मिळाले,’ अशा शब्दांत सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी रविवारी माेदी फडणवीस सरकारवर टीका केली.

‘सनातन’वरील हे संकट आम्ही ‘संधी’ मानू. आमच्या याआधीच्या साधकांबाबत जे झाले तेच वीरेंद्र तावडे यांच्याबाबतही घडत आहे. मात्र पुरोगाम्यांचा खरा चेहरा आम्ही पुढे आणूच, हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावे, असेही वर्तक म्हणाले.

डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी सीबीआयने तावडेला अटक केल्यावर आज सनातन संस्था हिंदू जनजागृती समितीच्या वतीने पुण्यात जनसंवाद सभा घेण्यात आली होती. या वेळी वर्तक बोलत होते. सुनील घनवट, श्याम महाराज राठोड आदी या वेळी उपस्थित होते. तावडेचे वकीलपत्र घेणाऱ्यांचा सत्कार या वेळी करण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...