आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Abhaysinh Mohite, Vanashree Labhshetwar MPSC Toppers\' List

एमपीएससीत नांदेडची वनश्री मुलींमध्ये प्रथम, अभयसिंह मोहिते राज्यात अव्वल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे/औरंगाबाद - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या फेब्रुवारी २०१४ मधील राज्यसेवा परीक्षेत सोलापूरचे अभयसिंह मोहिते (४७० गुण) प्रथम आले. नांदेडच्या वाघाळा येथील वैद्यकीय पदवीधर वनश्री अवधूत लाभशेटवार (४२५ गुण) महिलांत प्रथम, तर मागासवर्गीयांतून पुण्याचे विशाल साकोरे प्रथम आले. अभयसिंह मोहितेसह आपले १७५ हून अधिक विद्यार्थी यशस्वी ठरल्याचा दावा द युनिक अकॅडमीने केला आहे.

राज्यातून एकूण ४३८ उमेदवारांची विविध सेवापदांसाठी निवड झाली. त्यापैकी १२५ जण "अ', तर ३१३ जण "ब' वर्ग पदांसाठी पात्र ठरले. उपजिल्हाधिकारीपदी ४४, तर पोलिस उपअधीक्षकपदी २४ जणांची निवड झाली. ८४ उमेदवार पदव्युत्तर पदवीधारक, १३६ उमेदवार अभियांत्रिकी व ८४ उमेदवार वैद्यकीय शाखा पदवीधारक आहेत. या निकालाआधारे १३८ महिला उमेदवारांची व ११ अपंग उमेदवारांची शासनाकडे शिफारस करण्यात आली आहे.

उमेदवार असे :
1,76,224 जणांनी पूर्वपरिक्षा दिली
6,395 जणांनी मुख्य परिक्षा दिली
1,367 जणांना मुलाखतीसाठी बोलावले
438 जणांची अंतिम निवड

यशस्वी विद्यार्थ्यांची संख्या व पदे -
गट अ

उपजिल्हाधिकारी – ४४
पोलीस उपअधीक्षक – २४
तहसीलदार- ३५
सहायक विक्रीकर आयुक्त – ६
उपमुख्य कार्यकारी अधिकारी/ गटविकास अधिकारी – ९
सहायक संचालक, वित्त व लेखा विभाग – ७

गट ब
सेक्शन ऑफिसर – ५
सहायक गटविकास अधिकारी – ४६
सहायक निबंधक, सहकारी संस्था – १०
उपअधीक्षक, भूमी लेखा – १९
उपअधीक्षक, एक्साईज – २
सहायक आयुक्त, एक्साईज – १
सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी – ३
नायब तहसीलदार – २२७

औरंगाबादचे ६७ जण
औरंगाबाद विभागात ६७ जण यशस्वी झाले. विजयानंद शर्मा (४५३ गुण) प्रथम, तर अमोल भोसले (एसटी वर्ग) प्रथम आला. परभणीचा बसवराज शिवपुजे पोलिस उपअधीक्षक पदासाठी राज्यात दुसरा आल्याचे रिलायबल इन्स्टिट्यूटचे धनंजय आखात म्हणाले.