मुंबई – छगन भुजबळ यांच्या बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी आलेल्या नऊ चार तक्रारींपैकी चार तक्रारीमध्ये गैरव्यवहार आढळला नाही, त्यामुळे त्यांचा तपास बंद करत असल्याची माहिती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज (बुधवार) मुंबई उच्च न्यायालयात दिली. मात्र, या प्रकरणाचा तपास बंद करू नका तर सखोल चौकशी करा, असा आदेश न्यायालयाने एसीबीला दिला. या प्रकरणातील सात तक्रारींची चौकशी एसीबी तर इतर दोन प्रकरणांची चौकशी अंमलबजावणी संचलनालय करत आहे.