आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: नियंत्रण सुटल्याने डंपरची 11 गाड्यांना धडक, पुण्यात सहा ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव डंपरने एक-दाेन नव्हे, तर तब्बल ११ वाहनांना जाेरदार धडक दिली. त्यात सहा जणांचा मृत्यू झाला, तर चाैघे गंभीर जखमी झाले. पुण्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील देहूराेड-कात्रज बायपास रस्त्यावरील वडगाव धायरी पुलाजवळ गुरुवारी सकाळी अाठच्या सुमारास हा विचित्र अपघात झाला. दरम्यान, डंपरचालक संतोष केवट (रा. मूळ मध्यप्रदेश, सध्या कात्रज) याला अटक करण्यात आली आहे.

एक डंपर (एमएच १२ डी ३६५९) वडगाव पुलाजवळून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भरधाव डंपर रस्त्यावरील व्हाेल्व्हो बसला धडकला. जाेरदार धडकेमुळे व्हाेल्व्हो बस मॅक्स जीपवर धडकून रस्त्यावरील झाडावर अादळली. डंपरने पुढे जाऊन तवेरा गाडी, सहाअासनी रिक्षास धडक दिली. त्याच वेळी रस्त्यावरून जाणाऱ्या तीन-चार दुचाकींना धडक देत डंपरने फरपटत काही अंतरावर नेले. पुढे उभ्या असलेल्या सँट्राे, अाेम्नी कारवर हा डंपर अादळला. ही तिन्ही वाहने वडगाव पुलाचा कठडा ताेडून खाली काेसळली.

या विचित्र अपघातात दुचाकी चारचाकी वाहनांचा चक्काचूर हाेऊन सहा जणांचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झालेे. भीषण अपघातानंतर वाहनचालक पसार झाला अाहे. घटनेची माहिती िमळताच पाेलिस बचाव यंत्रणा घटनास्थळी येऊन त्यांनी नागरिकांच्या साथीने मदतकार्य केले. डंपरचालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून एकूण ११ वाहनांना धडक दिली सहा जणांचा बळी घेतला. या प्रकरणी चालकावर सिंहगड पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.

नियंत्रण सुटलेल्या डंपरने पुण्यातील सिंहगड रस्त्यावर समाेर येईल त्या वाहनाला अक्षरश: चिरडले. यात दुचाकी- चारचाकी वाहनांसह एका ट्रॅव्हल्सचेही माेठे नुकसान झाले.

वाहतुकीची काेंडी
डंपरनेरस्त्यावरील इतर वाहनांना वेगात धडक िदल्याने, रस्त्यावर माेठ्या प्रमाणावर अपघाताची तीव्रता जाणवली. अपघात झाल्यामुळे तातडीने अग्निशामक दलाचे जवान, पाेलिस, रुग्णवाहिका, क्रेन घटनास्थळी दाखल झाल्या. त्यासाेबतच नागरिकांनी माेठ्या प्रमाणात गर्दी केल्याने वाहतुकीचा बाेजवारा उडाला. वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागून काेणत्याही वाहनास पुढे जाणे शक्य झाले नाही. सुमारे दाेन िकलाेमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. वाहतूक पाेलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्याने त्यांना माेठी कसरत करावी लागली.

मृतात कुटुंबातील तिघे
सुभाषविनायक चाैधरी (रा.डाेंबिवली,ठाणे), बालाजी रामसिंग राठाेड (पत्ता उपलब्ध नाही), रवींद्र तुकाराम सावंत ( ३५), सारिका रवींद्र सावंत, रेवती रवींद्र सावंत (रा.मु.पाे. सांगवी, ता.जावळी, िज. सातारा), गायकवाड महेंबर यादव (रा. शिर्गापूर, ता. तुळजापूर, उस्मानाबाद) यांचा मृत्यू झाला अाहे. तर भालचंद्र विठ्ठल कालूरकर (४२, रा.धनकवडी, पुणे), रूपेश राजेंद्र पळसदेवकर (३४, रा.धनकवडी, पुणे), बाळासाहेब विठ्ठलराव घाडगे (५६, रा.काेंढवा, पुणे) शरद सर्जेराव माेरे (५४, रा.सातारा) हे गंभीर जखमी झाले अाहेत. त्यांच्यावर अनुक्रमे जगताप रुग्णालय, िसद्धी हाॅस्पिटल माई मंगेशकर रुग्णालयात अाैषधोपचार सुरू अाहेत.

पुढील स्लाइडवर पाहा, विचित्र अपघाताची छायाचित्रे