आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर रूग्णवाहिकेला अपघात, 3 ठार, 5 जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: अपघातग्रस्त रूग्णवाहिका)
पुणे- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर आज सकाळी झालेल्या एका भीषण अपघातात एक रूग्णवाहिका फ्लाय ओव्हरच्या पिलरला धडकून तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर, 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. रूग्णवाहिकेच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही घटना आज सकाळी साडेसहा वाजता लोणावळ्यातील सिंहगड कॉलेजच्या जवळ झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेडस्थित एका महिला पेशंटला ही संबंधित रूग्णवाहिका उपचारासाठी मुंबईकडे उपाचारासाठी घेऊन जात होती. रूग्णवाहिकेत एकून महिला पेशंटसह 8 लोक प्रवास करीत होते. सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास लोणावळ्यातील एका फ्लाय ओव्हरच्या पिलरला जाऊन गाडी धडकली. चालकाचे गाडीवर नियंत्रण सुटल्याने जोरदार टक्कर बसली. यात महिला पेशंटसह आणखी दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर, एका डॉक्टरांसह चालक व इतर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत व जखमींचे नावे कळालेली नाहीत.