आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेक फेल झालेल्या बसने 6 वाहनांना चिरडले; एकाचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुण्यातील बिबवेवाडीतील राजीव गांधीनगर येथे शहर वाहतूक करणाऱ्या ‘पीएमपीएमएल’ बसचे  उतारावर ब्रेक फेल झाले. त्यामुळे या भरधाव बसने  दुचाकी, टेम्पाे, बस अशा सहा ते सात वाहनांना धडक दिली. या अपघातात काळूराम वनाजी नकुम परमार (वय ४७, रा. काेंढवा, पुणे) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. या प्रकरणी बसचालक मनाेज धाेंडिबा बालशंकर (वय २४, मूळ रा. अक्कलकाेट, जि. साेलापूर) याच्याविराेधात गुन्हा दाखल करून त्याला पाेलिसांनी ताब्यात घेतले अाहे.   


साेमवारी सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास बिबवेवाडी येथून शिवाजीनगरला १३ नंबरची शहर बस निघाली हाेती. मात्र, काही अंतरावरच बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले. भरधाव  बसने रस्त्यावरून जाणाऱ्या टेम्पाे, एक पीएमपीएमएल बस, काेल्ड्रिंक्सचा टेम्पाे, तीन ते चार दुचाकी अशा सहा ते सात वाहनांना धडक दिली. यामध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या एकाला बसची जाेरदार धडक बसली अाणि त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर याबाबत माहिती मिळाल्यानंतर एक जेसीबी येथे घटनास्थळी बोलावण्यात आला. बस व टेम्पाे एकमेकात अडकले गेल्याने जेसीबीच्या साहाय्याने या दाेन गाड्या वेगळ्या कराव्या लागल्या.  अपघात झालेल्या ठिकाणी संध्याकाळच्या सुमारास रस्त्यावर भाजी मंडई भरत असते व त्यामुळे माेठी गर्दी असते. सुदैवाने सकाळच्या सुमारास वर्दळ कमी असताना हा अपघात घडला, त्यामुळे अनेकांचे प्राण वाचल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली अाहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व जखमी झालेल्या नागरिकांना पीएमपीएमएलने याेग्य माेबदला द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली अाहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत परिसरात अपघाताचे प्रमाण वाढल्याचे नागिरकांनी सांगितले.

पुढील स्लाईडवर आणखी फोटो

बातम्या आणखी आहेत...