आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरोप समारंभाला जाताना दहावीच्या विद्यार्थ्यांनी घेतला जगाचा निरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- दहावीच्या निरोप समारंभाला जात असताना दुचाकी घसरून पडल्यानंतर पाठीमागून आलेल्या ट्रकने चिरडल्याने दोन विद्यार्थी जागीच ठार झाले. शनिवारी सकाळी हा अपघात घडला. सिडकोतील नवजीवन स्कूलमध्ये इयत्ता दहावीत शिकणारे मुजफ्फर मेहबूब शेख व संकेत सज्जनसिंग चंदेल हे दोघे स्कूटी व मोटारसायकलवर शाळेत निरोप समारंभाला जात होते. त्रिमूर्ती चौकातील डेअरी समोरून हे दोघे गाडीवर बोलत असताना तोल गेला व मागून आलेल्या ट्रकखाली ते सापडले. ट्रकचे चाक अंगावरून गेल्यामुळे दोघांचाही मृत्यू झाला.
याप्रकरणी ट्रक (एमएच 15 सीके 5877) चालक संजय महतु आहिरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या अपघाताची माहिती कळताच शाळेचे शिक्षक व विद्यार्थ्यांवर शोककळा पसरली. शाळेतील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. यांच्या मित्रांना व शिक्षकांना अश्रू आवरता आले नाहीत...