आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर एस टी बस दरीत कोसळली, 4 प्रवासी जागीच ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर पांगोळीजवळ साता-याहून मुंबईकडे येणारी एसटी बस पलटून झालेल्या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. बसमध्ये सुमारे 30 प्रवासी असल्याचे अपघातातील जखमींनी सांगितले आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
चालू बस रस्त्याच्या खाली उतरल्याने अचनाक पलटी झाली आणि 50 ते 60 फूट खोल दरीत कोसळली अशी माहिती बसमधील एका जखमी प्रवाशाने दिली आहे. दरम्यान, पोलिस, डॉक्टर, रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. स्थानिक लोकांनी याठिकाणी मदतकार्य करण्यासही सुरुवात केली आहे. बस दरीत कोसळल्यामुळे मदतकार्यासाठी क्रेनही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अपघात झालेल्या बसचा क्रमांक MH-07 9830 असा आहे.