आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर चार वाहनांचा विचित्र अपघात, वाहतुकीचा खोळंबा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
समोरच्या ट्रकला धडक दिल्यानंतर कंटेनरची अशी अवस्था झाली. - Divya Marathi
समोरच्या ट्रकला धडक दिल्यानंतर कंटेनरची अशी अवस्था झाली.
पुणे- मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर ओडोशी बोगद्याजवळ आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास चार गाड्यांचा विचित्र अपघात झाला. मात्र, सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. एक जण किरकोळ जखमी झाला आहे. दरम्यान, चार गाड्या रस्त्यावरच असल्याने सकाळी सकाळीच मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक धिम्या गतीने पुढे सरकत असून, पुण्याहून मुंबईकडे जाणा-या लोकांची तारांबळ उडाली आहे. मुंबईकडे जाणा-या वाहनांच्या लांबच लांब राग लागल्या आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुण्याकडून मुंबईकडे जाणा-या एक ट्रकने पुढे चाललेल्या वाहनाला धडक दिली. त्यामुळे ट्रकचालकाने अचानक ब्रेक दाबला. त्याचवेळी मागून येत असलेला कंटेनर ट्रकवर जाऊन जोरदार आदळला. कंटेनरचालक त्यावेळी नशेत असल्याचे आढळले. त्याचवेळी कंटेनरच्या मागे एक होंडा सिटी व आणखी एक स्विफ्ट कार गाडी वेगाने धावत होत्या. या दोन्ही चालकांना गाडी कंट्रोल न झाल्याने या दोन्ही गाड्या कंटेनरवर जाऊन आदळल्या. यात दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले. ट्रक व कंटेनरचे नुकसान झाले. दरम्यान, या अपघातामुळे तेथे मोठी वाहतूक कोंडी झाली. मात्र, काही वेळातच महामार्ग पोलिसांनी क्रेन आणून तेथून वाहने हटविली. आता वाहतूक सुरळित झाली असली तरी वाहने धीम्या गतीने पुढे सरकत आहेत.
मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवर आज ब्लॉक घेतला जाणार आहे. आडोशी बोगद्याजवळ धोकादायक दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने तेथील लूज स्केलिंग करून खडकाला जाळ्या बसविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आज मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणारा मार्ग चार टप्प्यात 15 आणि 30 मिनिटांसाठी हा रस्ता ब्लॉक करण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. सकाळी 11 वाजल्यापासून धोकादायक दरडी काढण्याचे काम सुरू होईल. बुधवारीही हे काम सुरु होते.
मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणार्‍या लेनवर खंडाळा बोर घाटात खोपोली हद्दीत असणार्‍या आडोशी बोगद्याच्यावर आणि बोगद्याच्या मुंबईकडील दिशेच्या बाजूला लूज स्केलिंग करून डोंगराला जाळी बसविण्याचे काम सुरु आहे. दुपारी 12 ते 12.15, 1 ते 1.15, 2 ते 2.30 आणि 3 ते 3.30 असे एकूण दीड तासाचे चार ब्लॉक घेण्यात येणार आहे. हे ब्लॉक मुंबईकडून पुण्याकडे येणार्‍या मार्गावर घेण्यात येणार असले तरीही गरज पडल्यास पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या मार्गावरही हे ब्लॉक घेण्यात येत आहेत.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, या अपघातातील छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...