आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Accident On Pune Mumbai Express Highway Bhalchandra Kadam Injured

\'एक्स्प्रेस वे\' बनला मृत्यूचा सापळा; अपघातात विनोदी कलाकार भाऊ कदम जखमी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच आहे. कामशेतजवळ सोमवारी रात्री साडे नऊच्या सुमारास झालेल्या अपघातात सिने आणि विनोदी कलाकार भालचंद्र उर्फ भाऊ कदम यांच्या गाडीला अपघात झाला. त्यात भाऊंसह तीन जण जखमी झाले आहेत. ते मुंबईहून पुण्याकडे येत होते. चोवीस तासांत हा दुसरा अपघात आहे. त्यामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

भाऊ कदम यांच्यासोबत गाडीत अभय राणे, आणि मोटार चालक उमेश शिंदे हे होते. तिघांवर निगडीतील लोकमान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, कामशेतजवळ सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास दोन कारच्या धडकेत पाच जण ठार झाले होते तर दोन जण जखमी झाले होते. तसेच डिसेंबर महिन्यात टीव्ही कलाकार आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांच्या अपघातात मृत्यू झाला होता.