पुणे- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खंडाळा एक्झिटजवळ ट्रक उलटल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. ट्रक हटविण्यात आला असून जखमी ट्रकचालकास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आयआरबीची पेट्रोलिंग टीम, देवदूत, बोरघाट पोलिस, डेल्टा फोर्सच्या कर्मचाऱ्यांनी हा ट्रक बाजुला घेतला आहे. त्यामुळे आता वाहतूक हळूहळू सुरळीत होऊ लागली आहे.
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती